Headlines

संविधानाच्या प्रास्तविकेची प्रत पत्रकारांना भेट…

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वाटप..

⚡कणकवली ता.२७-: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगरपंचायतीवतीने संविधानाची प्रास्ताविका असलेल्या प्रतचे पत्रकारांना मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे, वीरेंद्र चिंदरकर, दिगंबर वालावलकर, राजा दळवी, उमेश बुचडे, तुषार हजारे, विराज गोसावी, साईल बागवे यांना फ्रेमचे वाटप केले. संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नगरपंचायतीच्यावतीने शहरातील नागरिकांना संविधानाची प्रास्ताविका असलेल्या प्रतचे वाटप केले जात आहे. यावेळी न. पं. प्रसासकीय अधिकारी अमोल अघम उपस्थित होते. संविधानच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह््यात ग्रा. पं. व न. पं. क्षेत्रात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात आहेत.
फोटो

You cannot copy content of this page