Headlines

पालकांनी जागवल्या बालपणातील आठवणी….

बांद्यात नाबर स्कूलमध्ये पालक क्रीडा दिन उत्साहात..

⚡बांदा ता.२७-: बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत ‘बचपन आफ्टर पचपन’ या संकल्पनेतून आयोजित पालक क्रीडा दिन उत्साहात पार पडला. या उपक्रमातून पालकांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पुरुष व महिला पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष दिवाकर म्हावळणकर होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शिक्षक पालक संघाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकांना दैनंदिन धावपळीतून काही क्षण विरंगुळ्याचे मिळावेत, तसेच खेळांच्या माध्यमातून बालपणीच्या आठवणी पुन्हा अनुभवता याव्यात, या उद्देशाने या क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध स्पर्धांचा आनंद घेतला.
पुरुष पालकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी १०० मीटर धावणे, लिंबू-चमचा, पॅट टो रेस, संगीत खुर्ची, पासिंग द बॉल आणि ओव्हर आर्म अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय पुरुष पालक व विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला.
महिलांसाठी तांदूळ व सोयापासून विविध पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रज्ञा सीताराम चांदेकर यांनी तांदळापासून पुलाव, तर आरोही कासकर यांनी सोया वेज बॉल तयार करून यश मिळवले. पाककला स्पर्धेचे परीक्षण अक्षय मयेकर यांनी केले.

स्पर्धांचे निकाल
पाककला स्पर्धेत प्रज्ञा सीताराम चांदेकर व आरोही कासकर यांनी यश मिळवले. महिला पालकांच्या १०० मीटर धावणे स्पर्धेत पूजा चव्हाण, श्रावणी परब, गार्गी दळवी व सोनल ठाकूर यांनी; लिंबू-चमचा स्पर्धेत सुशांती सावंत, सीमा शिरोडकर, प्रीती गवस व शर्मिला हळदणकर यांनी यश मिळवले. पॅट टो रेसमध्ये पूजा चव्हाण, गार्गी दळवी व सुमित्रा सावंत, तर संगीत खुर्ची स्पर्धेत सीमा शिरोडकर, प्रज्ञा चांदेकर व सुशांती सावंत यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार भूषण सावंत यांनी मानले. क्रीडाशिक्षक प्रशांत देसाई व सुमित्रा सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
फोटो:-
बांदा नाबर प्रशालेत क्रीडा ज्योत प्रज्वलीत करताना मान्यवर.

You cannot copy content of this page