⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय घनश्याम मालवणकर यांचा वाढदिवस सावंतवाडी उभा बाजार येथील तालुका काँग्रेस कार्यालयात केक कापून साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभय मालवणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, रविंद्र म्हापसेकर, आनंद आयरे, प्रदीप चौगुले, पीटर फर्नांडिस, संतोष जोईल, बाळा नमशी, विनायक नमशी, आफताब हेरेकर, नितीन वालावलकर आणि बाळा नाईक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
