Headlines

**सडूरे-शिराळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपसरपंच नवलराज काळे यांचे पालकमंत्र्यांना साकडे…

⚡वैभववाडी ता.२६-: वैभववाडी ते सडूरे-शिराळे या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब व धोकादायक झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना समोरचे दिसण्यास अडथळा निर्माण होत आहे.
या परिसरात बिबट्या व गवे यांचा वारंवार वावर असल्याने स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत सडूरे-शिराळेचे उपसरपंच नवलराज काळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
वैभववाडी-सडूरे शिराळे मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व झुडपे तातडीने काढून रस्ता मोकळा करावा.नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. रस्त्याची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपसरपंच नवलराज काळे यांनी निवेदनातून केली आहे.

You cannot copy content of this page