Headlines

दुचाकीच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्ध जखमी…

चालकाचे घटनास्थळावरून पलायन:गवळी तिठा परिसरातील घटना; नागरिकांनी जखमी वृद्धाला रुग्णालयात केले दाखल..

⚡सावंतवाडी ता. २६-: शहरातील गवळी तिठा परिसरात दुचाकीस्वाराने एका वृद्धाला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना आज दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दत्तराम पांडुरंग नाईक (वय ७२) हे वृद्ध जखमी झाले आहेत.
अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी नाईक यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती.

You cannot copy content of this page