निवडणुका, आंदोलने आणि नवमतदार नोंदणी मोहिमेबाबत चर्चा:युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार..

⚡कणकवली ता.२५-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासह तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक कणकवली येथील विजय भवन येथे पार पडली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि कणकवली तालुका युवासेनाप्रमुख उत्तम लोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत आगामी निवडणुका, आंदोलने, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक बांधणीच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक शाखा आणि वॉर्ड स्तरावर युवासेनेची कार्यकारिणी अधिक सक्षम व सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवमतदार नोंदणी मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. युवकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तरुणांच्या रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर युवासेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे सांगितले.
आगामी काळात प्रत्येक सामान्य तरुणापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न जाणून घेणे, युवकांना संघटनेशी जोडणे आणि संघटनात्मक ताकद वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. “बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मंत्र अंगीकारून आपण काम करूया,” असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपशहरप्रमुख प्रतीक रासम, विभागप्रमुख किरण वर्डम, नंदकिशोर परब, निकेतन भिसे, विजय गावकर, उमेश गावडे, निलेश रावराणे, वैभव मुरकर, गुरुनाथ पेंडणेकर, सतीश परब, सतीश मर्गज, संदीप गावकर, इमाम बटावले, रमेश राणे, श्रीराम गुरव, सिद्धेश गावकर, रोशन गुरव, सत्यवान गावकर, प्रवीण गुरव, प्रवीण गावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
