संजू परब :सरमळे येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता. २५-: दीपावलीनिमित्त सरमळे येथील सरमळे नांगरतास ग्रामस्थांच्या वतीने श्री सातेरी-भगवती देवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, सरपंच विजय गावडे, उपसरपंच श्री. गावडे, पोलीस पाटील श्री. नाईक, शाखाप्रमुख संजय गावडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संजू परब यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सरमळे गावाच्या पाठीशी आपण नेहमीच खंबीरपणे उभे राहू. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. दीपावलीनिमित्त आयोजित अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावातील महिला व ग्रामस्थांना एकत्र येण्याची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.
