Headlines

श्री देवी माऊली सोनुर्लीच्या चरणी प्रवीण भोसले कुटुंबीय नतमस्तक…

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी देवीचरणी प्रार्थना..

सावंतवाडी : महाराष्ट्राचे दुसरे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊली सोनुर्लीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांनी आपल्या कुटुंबीयांसह देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सून सौ. निवेदिता देवी व पुतणे अजयसिंह यांच्यासह श्री देवी माऊलीची ओटी भरून मनोभावे पूजा केली व देवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी देवीचे गावकर राजू व बाळा उपस्थित होते.
श्री देवी माऊली सोनुर्लीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांची अपार श्रद्धा आहे. महाराष्ट्राचे दुसरे पंढरपूर म्हणून या देवस्थानाची ओळख असून, नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपले नवस पूर्ण झाल्यानंतर ते फेडण्यासाठी हजारो भाविक देवीसमोर लोटांगण घालून आपली भक्ती व्यक्त करतात.
यावेळी प्रवीण भाई भोसले यांनी श्री देवी माऊलीच्या चरणी प्रार्थना करताना, सध्या महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने सतर्कतेने पावले उचलावीत आणि सर्वसामान्य जनतेला आवश्यक ती मदत व सहकार्य करावे, अशी प्रार्थना देवीचरणी केली.

You cannot copy content of this page