नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध..

⚡सावंतवाडी, ता. २५-: सावंतवाडी शहरातील १२२ वर्षांची परंपरा असलेल्या कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.व्ही. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील खुल्या व्हाळावर स्लॅब टाकून तो बंदिस्त करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 60 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक श्री.शिरवलकर व नागरिक प्रसाद वागळे यांच्या हस्ते गा-हाणे घालून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला
.यावेळी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर,सौ.शिरवलकर,सौ.धागळे,श्रेयस मूंज, प्रवीण देऊलकर,सागर मठकर, गणेश कुडव,अक्षय शिरवलकर,यल्लापा दोडमणी, कंत्राटदार निमिष परांजपे उपस्थित होते.
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या नामांकित शैक्षणिक संस्थेत बालवाडीपासून उच्च माध्यमिक विभागापर्यंत सुमारे ९५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच खुला व्हाळ असून, त्याच्या शेजारील इमारतीत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. हा व्हाळ उघडा असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. तसेच काही नागरिकांकडून या व्हाळात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले
