⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. दीपाली भालेकर आणि भाजपचे सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान ॲड. राहुल नार्वेकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. दीपाली भालेकर आणि दिलीप भालेकर यांनी त्यांचे स्वागत करून सदिच्छा व्यक्त केल्या.
