⚡सावंतवाडी ता.२४-: सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हे चांदणे फुलांनी’ या विशेष संगीत मैफलीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी नगरसेविका दीपाली भालेकर, प्राध्यापक गोवेकर सर, ज्येष्ठ कवी दादा मडकईकर, सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख निलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सद्गुरू संगीत विद्यालयाचे नामांकित व यशस्वी विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यांच्या साक्षीने रंगणाऱ्या या संगीत मैफलीमुळे संगीतप्रेमींना सुरेल पर्वणी अनुभवण्याची संधी मिळाली.
