Headlines

केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन…

डोंगरपाल-डिंगणे येथील स्वामी समर्थ सेवा मठाला सदिच्छा भेट..

⚡बांदा ता.२४-: केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज डोंगरपाल-डिंगणे येथील सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठाला सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मठातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या आगमनाने मठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रीपाद नाईक यांनी मठात सुरू असलेल्या विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांची माहिती घेतली. मठातील भक्तगण व स्थानिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीमुळे मठातील भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी गणपत गवस, परिमल सावंत, बाबाजी गवस, भिकाजी तिरोडकर, सागर सावंत, शशी राणे, जयेश सावंत, संजय नाईक यांच्यासह मठातील भक्तगण व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
फोटो:-
डिंगणे येथील श्री स्वामी समर्थ मठात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

You cannot copy content of this page