‘संगीत मत्स्यगंधा’, ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘संगीत ययाती आणि देवयानी’चे सादरीकरण; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्रावर मोफत प्रवेश,ळ पुराणिक यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.२४-: क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी, श्री परमेश्वर प्रोडक्शन निर्मित नाट्यपरिक्रमा २०२६ च आयोजन करण्यात आले असून तीन संगीत नाट्यप्रयोगांची विक्रमी दौड यात होणार आहे. ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’, ‘संगीत ययाती आणि देवयानी’ असे अभिजात मराठी संगीत नाटकांचे तीन नाट्यप्रयोग एकाच दिवशी होणार आहेत. पहिल्यांदाच असा विक्रम संगीत नाटकांत होणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी दिली. या नाट्यप्रयोगास कॉलेज युवकांना प्रवेश मोफत असणार असून ओळखपत्र बंधनकारक राहणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
श्री. पुराणिक म्हणाले, मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन व्हावा, अभिजात मराठी संगीत नाटकांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि या कलाप्रकाराला पुन्हा एकदा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी यांच्या वतीने रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी बॅ नाथ पै. येथे ‘नाट्यपरिक्रमा २०२६’ या विशेष नाट्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. संगीत मत्स्यगंधा, दुपारी ३.३० वा. संगीत वीज म्हणाली धरतीला व रात्री ८.३० वा. संगीत ययाती आणि देवयानी असे सलग तीन प्रयोग होणार आहेत. एकाच दिवशी, एकाच रंगमंचावर तीन वेगवेगळ्या अभिजात मराठी संगीत नाटकांचे तीन पूर्ण लांबीचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. मराठी संगीत रंगभूमीच्या सादरीकरणाच्या दृष्टीने हा एक आगळावेगळा, अभूतपूर्व आणि विक्रमी स्वरूपाचा प्रयत्न ठरणार आहे. सावंतवाडीच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशात या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीचा एक विशेष अध्याय जोडण्याचा आयोजकांचा मानस आहे. आजच्या बदलत्या मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये अभिजात संगीत नाटकांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तर जुन्या जाणत्या रसिकांना या नाटकांचा अविस्मरणीय अनुभव पुन्हा घेता यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. या उपक्रमाचे आयोजन क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून तिन्ही नाटकांची निर्मिती श्री परमेश्वर प्रॉडक्शन यांची आहे.
तसेच वसंत कानेटकर लिखीत संगीत मत्स्यगंधा या नाटकात बाळ पुराणिक, केतकी सावंत, स्वप्नील गोरे, तेजस प्रभुदेसाई, गुरुप्रसाद चिटणीस, गणेश दिक्षित, उमा जडये, शुभम परब हे कलावंत असणार आहेत. तर वि.वा. शिरवाडकर लिखित संगीत वीज म्हणाली धरतीला या नाटकात बाळ पुराणिक, केतकी सावंत, तेजस प्रभुदेसाई, आज्ञा कोयंडे, गुरूप्रसाद चिटणीस, गणेश दिक्षित, उमा जडये, कविता ओगले, सुधीर भागवत, श्रीकांत वावदे, विक्रम जांभेकर, सिद्धेश कुवळेकर, ज्ञानेश पाटकर, संदीप धुरी आदी कलाकार असणार असून वि.वा. शिरवाडकर लिखित संगीत ययाती आणि देवयानी नाटकात बाळ पुराणिक, केतकी सावंत, स्वप्नील गोरे, मधुरा लाकडे, तेजस प्रभुदेसाई, श्रीकांत वावदे, गणेश दिक्षीत आदी कलावंत असणार आहे. तसेच नेपथ्य सहाय्य राजेश जाधव, संजय पेडणेकर, ऑर्गन प्रसाद शेवडे, स्वप्नील गोरे, तबला निरज भोसले, पार्श्वसंगीत गणेशप्रसाद गोगटे, प्रकाशयोजना अभिषेक कोयंडे, सुरेश सातार्डेकर, वेशभूषा वैभवी पुराणिक, प्राजक्ता राणे, श्रीया गोरे, हर्षा सावंत, रंगभूषा संजय जोशी, रंगमंच व्यवस्था अभिमन्यू कदम, प्रथमेश कदम, तेजस जाधव, रवी जाधव, ध्वनी व्यवस्था हेमंत मेस्त्री करणार आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांना या नाट्यप्रयोगात मोफत प्रवेश असणार असून ओळखपत्र बंधनकारक राहणार आहे. तर तीन प्रयोगांसाठी 500 व 1000 रूपये मूल्य असणार आहे. सावंतवाडी व परिसरातील नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तिन्ही नाट्यप्रयोगांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी केले आहे. यावेळी सचिव सीए लक्ष्मण नाईक, खजिनदार हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते

