Headlines

अणसूर ग्रामपंचायतीचाजिल्हा परिषदेच्या वतीनेसन्मान

वेंगुर्ला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सोमवारी झालेल्या या सन्मान सोहळ्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा गौरव स्वीकारला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश परब तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि वतीने अणसूर ग्रामपंचायतचा गौरव करण्यात आला.
हा सन्मान स्वीकारताना अणसूर ग्रामपंचायतचे
सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सदस्य सुधाकर गावडे, वामन गावडे, संयमी गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, ग्रामस्थ किरण मालवणकर.
उपस्थित होते. गावातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवता आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

फोटो :

You cannot copy content of this page