खोक्रल येथे देवीचे दर्शन घेत भाविकांशी साधला संवाद..

⚡दोडामार्ग ता.२३-: जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या खोक्रल येथील श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या जत्रोत्सवानिमित्त युवा नेते विशालभाई परब यांनी उपस्थित राहून श्री शांतादुर्गा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर आणि भाविकांशी आत्मीयतेने संवाद साधला. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या अशा उत्सवांमुळे गावातील एकोपा व सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या जत्रोत्सवाला ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
