Headlines

जिजाऊ शैक्षणिक – सामाजिक संस्थेतर्फे आडेली हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, विभाग रत्नागिरी तर्फे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी आडेली ग्रामपंचायत सरपंच यशस्वी कोंडसकर, शिक्षण प्रसारक समिती वेतोरे संचालक सुरेश धुरी, वेंगुर्ला येथील मच्छिमार नेते
वसंत तांडेल, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी स्वरूप सावंत, कुणाल निकम, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू उर्फ तात्या कोंडसकर , पोलिस पाटील संजना होडावडेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राजेश सामंत, महादेव परब, सत्यवान धर्णे,
बाबा धर्णे, प्रशांत धर्णे (शिक्षणतज्ज्ञ- विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती कृ. का. चमणकर हायस्कूल, आडेली) आदी मान्यवर उपस्थित होते. जिजाऊ संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्याबद्दल जिजाऊ संस्थेचे प्रशालेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page