Headlines

वैभववाडीत २६ रोजी भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळ, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वैभववाडी येथील भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांचे मनोगत तसेच आभार प्रदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आणि उद्देशिकेतील विचारांचा जनमानसात प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे सचिव रवींद्र पवार अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page