Headlines

वेंगुर्ला श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सवास भाविकांची गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा पहिला वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर ) रोजी संपन्न होत आहे. यावेळी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत केळी- नारळ ठेवणे व माहेरवाशींणी ओटी भरणे साठी भाविक, महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रात्री पालखी प्रदक्षिणा, पार्सेकर दशावतार नाट्यकंपनीचे दशावतारी नाटक सादर होणार आहे.
श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ला मार्फत या मोठ्या जत्रेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असुन भक्तिमय वातावरणात व उत्साहात हा उत्सव साजरा होत आहे.

You cannot copy content of this page