शहरप्रमुखपदी देवेंद्र टेंबकर, तर महिला उपजिल्हा संघटकपदी सीमा मठकर यांची नियुक्ती..

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सावंतवाडी शहरप्रमुखपदी देवेंद्र पांडुरंग टेंबकर, तर सावंतवाडी तालुका महिला उपजिल्हा संघटकपदी सौ. सीमा मिलिंद मठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संघटनेच्या कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
