Headlines

जानेवारीत कणकवली पर्यटन महोत्सव…

पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने कणकवलीत सहविचार बैठक : महोत्सवाच्या रुपरेषेवर चर्चा..

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव जानेवारीच्या दुसºया आठवडयात आयोजित करण्याबाबत एकमत झाले. महोत्सवात नावीन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा केली. प्रत्येक कणकवलीकारला सहभागी करून महोत्सवात घेण्याचे ठरले. महोत्सव वैशिष्टपूर्ण होण्यासाठी उपस्थितांनी संकल्पना मांडल्या. महोत्सवाची ढोबळ रुपरेषा तयार करण्यात आली. पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी कणकवलीकरांनी सहभागी होऊन महोत्सव अविस्मरणीय करावा, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सव घेण्याबाबत न. पं. च्या नूतन प. पू. भालचंद्र सभागृहात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार बैठक घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सत्यजित उर्फ बाळू पारकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, नगरसेविका जाई मुरकर, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, अभिनेते अभय खडपकर, प्रा. हरिभाऊ भिसे, दिवाकर मुरकर, संजय मालंडकर, संजय राणे, महेश काणेकर, महेश कोदे, किशोर कदम, चित्रकार नामानंद मोडक, संदीप पेंडुरकर, एस.एल.सपकाळ, मधुरा पालव, दिव्या साळगावकर, शीतल मांजरेकर, रिना जोगळे, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, दादा कोरडे, अ‍ॅड. एन. आर. देसाई, सुजीत जाधव, रामदास मांजरेकर, संतोष पुजारे, सौरभ पारकर, सोहम वाळके, दीक्षा पुरळकर, निकीत मुरकर, तेजस राणे यांच्यासह कलाकार व नागरिक उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव ७ ते १० जानेवारी २०२७ या संभाव्य कालावधीत घेण्याचे ठरले. चार दिवशीय पर्यटन महोत्सवात कणकवलीतील स्थानिक कालकारांना सांस्कृतिक केव्हा घ्यावा, याबाबत चर्चा विमियम करण्यात आली. चर्चेअंती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थानिक कालकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरले. सुजीत जाधव यांनी पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा व नवनवीन संकल्पना मांडल्या. नव्या पिढीला कणकवलीच्या इतिहास कळवा, यादृष्टिने त्यांनी काही संकल्पना मांडल्या. पर्यटन महोत्सवानिमित्त वार्डनिहाय विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर, अभय खडपकर, संजय राणे यांनी स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक दर्जेदार व चांगला होण्यासाठी काही संकल्पना मांडून आयोजकांना काही सूचना देखील केल्या. नीलम पालव यांनी महिलांसाठी पैठणी स्पर्धा तर लहान मुलांसाठी स्पर्धा व लिटिल चॅम्पसारखे कार्यक्रम घेण्याची सूचना केली. महोत्सवादरम्यान स्थानिक विक्रेते व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महोत्सव स्थळी स्टॉल उभारणी मागणी केली. पर्यटन महोत्सवाची वातावरणनिर्मिती होण्यासाठी वार्डनिहाय स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्याची सूचना उपस्थितांनी केल्या. महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने केली जाईल. शोभा यात्रेत वार्डनिहाय चलचित्र देखावे तयार करण्याचे ठरले. शोभायात्रा पटकीदेवी ते पर्यटन महोत्सव ठिकाणपर्यंत काढण्याबाबत नियोजन करण्यात आले. पर्यटन महोत्सवानिमित्त कणकवली शहरात स्वच्छ व सुंदर कणकवली संकल्पना राबविण्याचे ठरले. कणकवली पर्यटन महोत्सवात प्रत्येक कणकवलीकराला सहभागी करून घेण्यावर चर्चा झाली. महोत्सवात ढोलवादन स्पर्धा घेण्याची ठरले. महेश काणेकर यांनी पर्यटन महोत्सव दिमाखदार होईल, याबाबत काही सूचना केल्या. दीक्षा पुरळकर यांनी महोत्सवात स्थानिक कालकारांना प्राधान्य देण्यात यावी, अशी मागणी केली. पर्यटन महोत्सवाचे प्रत्येक कणकवलीकारला निमंत्रण मिळावे, यासाठी काही व्यक्तींवर जबाबदारी सोपवण्यात आली. नामनंद मोडक यांनी कणकवली शहरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली. महोत्सवांतर्गत कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, यावर विचारमथंन झाले.
पर्यटन महोत्सव नावीन्यपूर्ण अन् अविस्मरणीय करणार – पारकर
कणकवली नगरपंचायतीचा मी नगराध्यक्ष असताना पहिला पर्यटन महोत्सव २००३ मध्ये पार पडला. त्यानंतर २३ वर्षांनतर नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पुन्हा कणकवली पर्यटन महोत्सव होत आहे. हा महोत्सवात प्रत्येक कणकवलीकराला मी सहभागी करून हा महोत्सव नावीन्यपूर्ण अन् अविस्मरणीय करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. यासाठी मला व माझ्या टीमला कणकवलीकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
स्थानिक कालाकारांना सहभागाचे आवाहन
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थानिक कलाकरांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे. या कार्यक्रमात ज्या स्थानिक कलाकरांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रा. हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर, संजय राणे, अभय खडपकर यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page