⚡सावंतवाडी ता.२५-:
सोनुर्ली श्रीदेवी माऊली च्या वार्षिक जत्रोत्सवाला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपस्थिती दर्शवत श्री देवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले.
सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली देवीची जत्रा ही लोटांगणाची जत्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. हाकेला पावणारी आणि संकटाला धावणारी अशी ही देवीची ख्याती आहे. या जत्रोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने जनसागर लोटतो. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनीही सायंकाळी या जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शवित माऊलीचे दर्शन घेतले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दुष्काळाला सामोरे जाण्याचे ताकद आईने माऊलीने द्यावी. असे साखडेही त्यांनी यावेळी माऊली चरणी घातले. श्री परब यांचा देवस्थान कमिटीच्या वतीने यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस उपस्थित होते

