⚡सावंतवाडी, ता. २५-: सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिरात आयोजित कवळास उत्सवानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंदिराला भेट देत श्री देव रवळनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधन कवटणकर, किरण प्रभू, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर, नांदी प्रभू, सृष्टी वेंगुर्लेकर, आप्पागाडी, दीपक वेंगुर्लेकर, श्रीकांत आजगावकर आदी उपस्थित होते.
