आमदार दीपक केसरकर, निलेश राणे,संजू परब यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन..

⚡सावंतवाडी ता.२६-: संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा लोकार्पण सोहळा, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि स्वच्छता अभियान असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, जिल्हा परिषद सभापती संतोष साटविलकर, मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रिजनल ऑफिसर नीलेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
