⚡कणकवली ता.२६-: कलमठ ग्रामपंचायतीमार्फत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला व यावेळी घरकुल लाभार्थ्यांना संविधानाची प्रत देण्यात आली. तसेच संविधानाचे सामुहिक वाचनही करण्यात आले.

यावेळी कलमठ – सिद्धार्थ कॉलनी येथील संविधान स्तूपला पुष्पहारही अर्पण करण्यात आला. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, संविधानाने खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली आहे. माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान स्तूप गावात उभारले असल्याचा अभिमान आहे.
यावेळी ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सिद्धार्थ कॉलनीचे चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, माधवी कदम, रोहन कदम, घरकुल लाभार्थी सुनीता पाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र कदम, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, अण्णा सावंत, शैलेश कदम उपस्थित होते.
