⚡मालवण ता.२७-: मालवण शहरातल्या ‘आशादिप नर्सरी’ प्रशालेत बालदिन उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा बालदिन साजरा करण्यात आला.

यावेळी आशादीप नर्सरीमधील शिशुंच्या महिला पालकांनी बालकांच्या आनंदासाठी नृत्य सादरीकरण केले. यामध्ये सिस्टर फातिमा यांच्यासह नझ़िरा शेख़, चैताली आचरेकर, स्नेहल सिंनकर, नम्रता लुडबे, सिद्धी सामंत, सुप्रिया परब, मनस्वी धुरी, ऋता धुरी, जेसिन्ता फर्नांडिस, लॅन्सी सोज, जाॅयस राॅड्रिक्स यांचा सहभाग होता.
यावेळी शिक्षिका सिस्टर फातिमा, मीना लुगेरा, सिस्टर रोझा, सिस्टर शांती आणि आशादीप नर्सरीच्या शिशुंचे पालक उपस्थित होते.
