बांदा/प्रतिनिधी
वाफोली (ता.सावंतवाडी) येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक १ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता देवघर कडून पालखी कळस आणणे, दुपारी १२ वाजता देवीची विधिवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे, फेडणे चालू होतील. रात्री ११ वाजता मंदिरा भोवती पालखी सोहळा पार पडणार आहे. तर रात्री १ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. बुधवार दिनांक २ रोजी सकाळी सहा वाजता दहीकाल्याचा कार्यक्रम होणार आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांनी तसेच नाट्य प्रेमींनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान स्थानिक समिती मानकरी व वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-
वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर.

