⚡वेंगुर्ला ता.०२-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या वनस्पतीशास्त्र व रसायनशास्त्र विभागामार्फत सर्टिफिकेट कोर्स इन इको-टुरिझम अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, माझा वेंगुर्ला, ज्ञानकुंज कॉलेज ऑफ आयटी अॅण्ड मॅनेजमेंट,ओरस, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वनविभाग, गार्डन्स क्लब कोल्हापूर व इंडियन वुमन साइंटिस्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने “शाश्वत व निरोगी भविष्यासाठी परिसंस्थात्मक सेवा” या विषयावर चार दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम व राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र वृक्ष वर्धिनी च्या डॉ. अनुराधा उपाध्ये यांच्या हस्ते पानांच्या गुम्फलेल्या वेणीची गाठ सोडवुन करण्यात आले.वेंगुर्ला
नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, बॅरिस्टर नाथ पै संस्थेच्या अदिति पै ,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मानसिंगराजे निम्बालकर , गार्डन्स क्लब कोल्हापुराच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी ,माझा वेंगुर्ला च्या श्रुती गायचोर, निलेश चेंदवणकर , बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कोलेज चे एस एस चमणकर , एस एच माने , द्न्यान्कुंज कोलेज चे प्राचार्य त्र्यंबक मानासपुरे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी खर्डेकर कोलेज चे महाराष्ट्र व्रुक्षवर्धिनी , गार्डेन्स क्लब कोल्हापुर , स्वामिनी महिला बचत गट यांच्या बरोबर परस्पर सामन्जस्य करार करण्यात आले. त्याचे वाचन डॉ. व्ही. एम. पाटोळे यानी केले.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बॅ.नाथ पै कम्युनिटी सेंटर, कॅम्प (पंचायत समिती जवळ),वेंगुर्ला येथे पर्यावरण पुरक स्थानिक उत्पदनांचे स्टोल्सचेहि उद्घाटन करण्यत आले.
या कार्यशाळेमध्ये पाणथळ जागा (Wetland), निसर्ग पर्यटन (इको-टुरिझम), कांदळवन (Mangroves), देवराई (sacredgroves), समुद्री शेवाळ (Marine Algae), पुष्पसंवर्धन (Floriculture) तसेच नैसर्गिक सुगंध (NaturalAroma)या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यासंदर्भात माहिती समन्वयक डॉ. धनश्री पाटिल यानी दिली .युवकांना भविष्यातील परिसंस्था संवर्धनासोबत सामाजिक-आर्थिक विकासासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.प्रमुख पहुण्या डॉ. उपाध्ये , डॉ. निम्बाळकर ,दिलीप गिरप यानी आपल्या भाषणामध्ये याचे कौतुक करतानाच वेंगुर्ला मधील विद्यार्थ्यांसाठी अशी वर्कशॉप आयोजित केल्याबद्दल अभिनन्दन केले. बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विविध संस्थांचे 40 विद्यार्थी, संशोधक, शिक्षक ,पर्यावरण व इको-टुरिझम क्षेत्राशी संबंधित व्यक्ती अशा 60 जणांनी कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवला आहे.
वेंगुर्ला येथे क्षमतावृद्धी कार्यक्रम व राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन…
