⚡वेंगुर्ला ता.०२-: म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ हा नेहमीच खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी राहिला आहे आणि राणे यांनी परुळे पंचायत समिती भाजपाच्या वतीने मला उमेदवारी दिली असताना परूळे पंचायत समिती मतदार संघात भाजपाकडून हिसकावून घ्यायचा शिंदे सेनेचा डाव होता तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे, असे प्रतिपादन परूळे पंचायत समिती मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निलेश सामंत यांनी प्रचाराचा शुभारंभ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. परुळ्याचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा रवळनाथ श्रीदेवी वराठी यांना श्रीफळ ठेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महायुतीच्या वतीने म्हापण जिल्हा परिषद व पंचायत समिती शिंदे सेनेला देण्यात आली होती. तर परूळे प.स. साठी भाजपला जागा सोडण्यात आली होती आणि मला स्वतःसाठी एबी फॉर्म ही देण्यात आला. त्यानुसार मी भाजपची उमेदवारी दाखल केली मात्र शेवटच्या क्षणी परुळे पंचायत समिती मतदारसंघात बंडखोरी करून शिंदे सेनेने आपले उमेदवार कायम ठेवल्याने म्हापण जि.प.मतदारसंघात महायुती संपुष्टात आली असून आपण भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवत आहोत. तर म्हापण जिल्हा परिषदेसाठी अपक्ष म्हणून वंदना किनळेकर निवडणूक लढवत आहेत. म्हापण जि.प. मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम अभेद राहील, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करा, असे मार्गदर्शन माजी सभापती निलेश सामंत यांनी परूळे येथे केले. यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत सरपंच निलेश सामंत, परूळे सरपंच प्रणीती आंबडपालकर, उपसरपंच राजू दुधवडकर, प्रसाद पाटकर, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, रसिका गोवेकर, सीमा सावंत, भानुदास राणे, गणपत माधव, बाळा राऊळ, किरण किनळेकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, पुरुषोत्तम प्रभू, बाळा पार्सेकर, रुपेश राणे आदी सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उबाठा सेनेचे परुळे ग्रामपंचायत सदस्य सुनात राऊळ, माजी उपसरपंच जयवंत राऊत, सुषमा राऊळ यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपचे निलेश सामंत यांच्या परुळे मतदारसंघात प्रचारास प्रतिसाद…
