शोभा गावडे: नागरिकांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡आंबोली ता.०३-: आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून, यापुढेही जनता विकासाला साथ देईल, असा विश्वास भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार शोभा गावडे यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या की, आंबोली मतदारसंघ हा पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प येत असून, भाजपच्या माध्यमातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या पाच वर्षांतही आंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक प्रकल्प आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, प्रचारादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप केले. विकासाला साथ देण्यासाठी आणि भाजपच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
