⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपली उमेदवारी मागे घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपच्या समिधा समीर नाईक यांना आडेली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ( महायुती तर्फे ) उमेदवारी दिली आहे. त्यांच्या आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारास भरीव प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.
समिधा समीर नाईक यांच्यासह महायतीतर्फे नितीन मांजरेकर ( आडेली पं. स.) व शीतल राऊत ( वायंगणी पं. स.) यांच्या एकत्रित प्रचारासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या प्रचारासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक, नगरसेवक संदेश निकम,नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, नगरसेविका शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, सरपंच पूर्णवेळ सहभागी झाले आहेत. मठ, वायंगणी, दाभोली आदी भागातील प्रचार पूर्ण झाला असून, आडेली, पालकरवाडी, खानोली, वेतोरे भागात जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित आहे. या प्रचारात मठ सरपंच रुपाली नाईक, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील,वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, अन्य सरपंच, अन्य नगरसेवक, नगरसेविका, आडेली माजी ग्रा. पं. सदस्य विष्णू कोंडसकर, अजित नाईक, प्रशांत नाईक, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, प्रशांत प्रभूखानोलकर, प्रवीण गडेकर, सुधीर धुरी, सौरभ नाईक, साक्षी नाईक, पूजा सोनसुरकर,अनिल तेंडोलकर, बबन परब, भूषण बांबार्डेकर, महेश प्रभू खानोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात समिधा समीर नाईक यांच्या प्रचारास मोठा प्रतिसाद…
