कारला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सावंतवाडी
मारुती सुझुकी कारला समोरुन धडक दिल्याप्रकरणी बेळगाव येथील मोटारसारकलस्वार सुनील मारुती सुरडे (वय 27) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील सुरडे यांने एक एप्रिल रोजी साडेतीन वाजताच्या दरम्यान भरधाविकात समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी कारला आंबोली नानापाणी वळणावर धडक दिली होती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवरून सुनील सुरडे याच्यावर या वेगाने मोटरसायकल चालवून कारला धडक दिल्या प्रकरणी व स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहे.

You cannot copy content of this page