विविध स्पर्धांमध्ये अणसूरपालच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत तुळस प्रभागात अणसूरपाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यात निबंध स्पर्धेत यशश्री केरकर (द्वितीय), वक्तृत्व स्पर्धेत काजल गावडे (तृतीय), चित्रकला स्पर्धेत सानिया पालकर (प्रथम), रांगोळी स्पर्धेत काजल गावडे (प्रथम) व चरित्रा राऊळ (द्वितीय) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष सुनिल गावडे, सचिव जितेंद्र गावडे, शालेय समिती अध्यक्ष मातोंडकर यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून श्रमदान केले

You cannot copy content of this page