*⚡कणकवली ता.२९-:* गुंतवणूक करताना डोळसपणे गुंतवणूक करणे आवश्यक आह. खोट्या योजनांना न फसता सुरक्षित गुंतवणूक करा. पैशाला आपला मित्र बनवा, म्हणजे तो आपल्या सोबत राहील. असे मत भावेश व्होरा यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अर्थशास्त्र विभाग, आय क्यू ए सी व गुंतवणूकदार शिक्षण व कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आर्थिक साक्षरता” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ राजेंद्रकुमार चौगुले यांनी गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे गरजेचे आहे अर्थशास्त्रामध्ये केलेला अभ्यास हा प्रत्यक्षात गुंतवणूक करताना वापरणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. सेबी प्रतिनिधी प्रसाद जगदाळे यांनी गुंतवणूक का गरजेचे आहे व ती कशी करावी याचे मार्गदर्शन केले शेवटच्या सत्रामध्ये मार्गदर्शन करताना श्री संदीप वाघ म्हणाले की युवकांनी जर संपन्न आयुष्य बनवायचे असेल तर लवकरात लवकर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कार्यशाळेमध्ये उपस्थित श्री नवणीतलाल भाटिया यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रा. डॉ बाळकृष्ण गावडे प्रा. युवराज महालिंगे प्रा. सागर गावडे प्रा. गणेश टेकळे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सुरेश पाटील यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी 75 विद्यार्थी उपस्थित होते.
कणकवली कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरता विषयावर कार्यशाळा