कणकवलीत भाजपचा झंझावात; राणेंच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय…

उ. बा. ठा. सेनेचा दारूण पराभव, नाटळ येथील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त:कणकवली तालुक्यात जि.प.चे सदस्य ६ भाजप, १ शिंदे सेना, १ अपक्ष विजयी..

⚡कणकवली ता.०९-: तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध निवडणूक लढवली. यात प्रमुख विरोधक असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठेही शिल्लक राहिला नाही असेच म्हणावे लागेल. खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य भाजपसाठी आणि जानवली जिल्हा परिषद सदस्य शिवसेना (शिंदे) साठी अशा दोन जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या असल्यामुळे ६ जिल्हा परिषद मतदार संघात निवडणूक झाली. या निकालात पाच जिल्हा परिषद उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. फोंडाघाट येथे भाजपचे बंडखोर उमेदवार राजन चिके निवडून आले. कणकवली तालुक्यात भाजपचे सहा तर शिंदे सेना एक आणि अपक्ष एक असे एकतर्फी विजय मिळवून कणकवली हा भाजपचा आणि विशेषतः राणेंचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले. तर १६ पंचायत समिती मतदारसंघातून १४ ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. यातून पुन्हा एकदा महायुती श्रेष्ठ ठरली आहे. तालुक्यात एकूण १५५४ लोकांना नोटा पर्यायाचा वापर केला.
जिल्हा परिषद मतदारसंघाचे निकाल-

कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संतोष पारकर यांनी ४९९५ मते मिळवून विजय मिळवला. उद्धवसेनेचे हनुमंत म्हसकर यांना १७२५ मते मिळाली. संतोष पारकर यांना ३२७० मतांचे मताधिक्य मिळाले. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष राजन चिके यांनी ४१६२ मते मिळवत विजय मिळवला. शिंदेसेनेचे सदानंद उर्फ बबन हळदिवे यांना ३५६० मते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनंत पिळणकर यांना ५३६ मते मिळाली. राजन चिके यांना ६०२ मतांचे मताधिक्य मिळाले. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे मनोज रावराणे यांनी ५८२८ मते मिळवत विजय मिळवला. अपक्ष प्रमोद सांगवेकर यांना ८२९ मते मिळाली. मनोज रावराणे यांना ४९९९ मतांचे मताधिक्य मिळाले. नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी ६३१३ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेचे उत्तम लोके यांना ११२० मते मिळाली. संदेश सावंत यांना ५१९३ मतांचे मताधिक्य मिळाले. कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या शीतल दळवी यांनी ४१११ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेच्या प्राची आमडोसकर यांना ३०८६ मते मिळाली. शीतल दळवी यांना १०२५ मतांचे मताधिक्य मिळाले. कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या सुप्रिया मेस्त्री यांनी ४९९३ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेच्या वैदेही गुडेकर यांना १८४८ मते मिळाली. सुप्रिया मेस्त्री यांना ३१४५ मतांचे मताधिक्य मिळाले.

पंचायत समिती मतदारसंघाचे निकाल-
खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात शिंदेसेनेचे गुरुप्रसाद शिंदे यांनी १५०६ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेचे रामचंद्र राऊत यांना २८९ मते तर अपक्ष रफीक नाईक यांना १३२७ मते मिळाली. या मतदारसंघात गुरुप्रसाद शिंदे यांना १७९ मतांचे मताधिक्य मिळाले. तळेरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे राजेश जाधव यांनी १९६० मते मिळवून विजय मिळवला. कॉंग्रेसचे प्रवीण वरुणकर यांना १०१२ मते मिळाली. राजेश जाधव यांना ९४८ मतांचे मताधिक्य मिळाले.
कासार्डे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सहदेव उर्फ अण्णा खाडये यांनी २१८८ मते घेत विजय मिळवला. उद्धवसेनेचे मयुर पेडणेकर यांना ७७४ मते मिळाली. खाडये यांना १४१४ मतांचे मताधिक्य मिळाले. लोरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या मानसी मराठे यांनी २७८२ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेच्या कीर्ती एकावडे यांना ६७८ मते मिळाली. मानसी मराठे यांना २१०४ मतांचे मताधिक्य मिळाले. फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे पवन भालेकर यांनी २३७० मते घेत विजय मिळवला. उद्धवसेनेचे चैतन्य सावंत यांना २७४ मते, अपक्ष सुभाष सावंत यांना १८२० मते, अपक्ष राजेश शिरोडकर यांना २२४ मते तर अपक्ष साईनाथ भोवड यांना ९९ मते मिळाली. पवन भालेकर यांना ५५० मतांचे मताधिक्य मिळाले. हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी २०१० मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेचे अविनाश सावंत यांना ८५६ मते तर अपक्ष विद्याधर तांबे यांना ५७५ मते मिळाली. चंद्रहास सावंत यांना ११५४ मतांचे मताधिक्य मिळाले. कळसुली पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण गावडे यांनी २५३३ मते मिळवली. उद्धवसेनेचे मनोहर मालंडकर यांना १२७४ मते तर अपक्ष भालचंद्र दळवी यांना ८३ मते मिळाली. लक्ष्मण गावडे यांना १२५९ मतांचे मताधिक्य मिळाले. कलमठ पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे गुरुनाथ वर्देकर यांनी २३६५ मते मिळवत विजय मिळवला. अपक्ष विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांना १३२२ मते मिळाली. वर्देकर यांना १०४३ मतांचे मताधिक्य मिळाले. नरडवे पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या राजश्री पवार यांनी २९१८ मते मिळवून विजय मिळवला. उद्धवसेनेच्या पूजा गावकर यांना ८२० मते मिळाली. राजश्री पवार यांना २०९८ मतांचे मताधिक्य मिळाले. ओसरगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदेसेनेच्या अक्षता राणे यांनी १६९२ मते मिळवत विजय मिळवला. उद्धवसेनेच्या चंदना राणे यांना १६१० मते मिळाली. या मतदारसंघात अक्षता राणे यांना ८२ मतांचे मताधिक्य मिळाले.

You cannot copy content of this page