पर्यावरणदिनी वायंगणी येथे कासवमित्रांचा सन्मान…

वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला.

  यात सुहास तोरसकर, प्रकाश साळगांवकर, संतोष साळगांवकर, गौरेश खडपकर, चंद्रशेखर तोरसकर, प्रकाश सागवेकर या कासवमित्रांचा समावेश आहे. कासवमित्रांच्या परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य झाले असून निसर्गाची शाश्वत जपणूक घडविण्यात ते मोलाचा वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरूनाथ पाटील यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, राजू राऊळ, वसंत तांडेल, दादा केळुसकर, वैभव शेणई, बापू पंडित, आनंद गावडे, ओंकार चव्हाण, प्रशांत खानोलकर, वायंगणी उपसरपंच रविद्र धोंड, सदस्य अनंत केळजी, विद्या गवेकर, राखी धोंड, सविता परब, दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत यांच्यासह शेखर येरागी, सुनिल खोबरेकर, संजय येरागी, रमेश खोबरेकर, नरहरी तोरसकर, सचिन खडपकर, जयेंद्र येरागी, हरिश्चंद्र म्हाकले, घनःश्याम तोरसकर, प्रदिप म्हाकले, रितेश म्हाकले, भालचंद्र तोरस्कर, प्रसाद पेडणेकर, उमेश सारंग, विनायक कामत, सूर्यकांत सागवेकर, गोपाळ तारी आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page