कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव…

⚡मालवण ता.१४-:
कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त रविवार १५ फेब्रुवारी रोजी विविधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्री निमित्त मंदिरात सकाळी विधीवत श्री रामेश्वर देवाची पूजाअर्चा, अभिषेक, भाविकांना ग्रामदेवतेचे दर्शन, सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थ भजनी मंडळाची संगीत भजने, रात्रौ ९. ३० वा. पुराण वाचन कार्यक्रमनंतर श्री देव रामेश्वर यांची मंदिर पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. श्री रामेश्वर मंदिर ते सातेरी देवी मंदिर असा हा पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचा आणि पालखी सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट कांदळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page