⚡मालवण ता.०५-:
माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या वतीने शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा शनिवार दि. ७ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निराधार तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणास आधार देण्याच्या उद्देशाने संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्तीच्या स्वरूपात बहाल करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास पालव तसेच संचालक मंडळ, पदाधिकारी वं सभासद यांनी केले आहे.