⚡कणकवली ता.१४-: मुंबई – गोवा महामार्गावर सावडाव तिठा येथे मुंबई-गोवा लेनवर शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या मॅजिक – सुझुकी ब्रेझा कारमध्ये अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी MH-47 CD 2678 क्रमांकाची सुझुकी ब्रेझा कार (चालक – प्राईम तुषार पराडकर, वय २६, रा. कांदिवली, चारकोप, एकता नगर ओल्ड म्हाडा, मुंबई) सावडाव तिठा येथील पाणी बॉटल फॅक्टरीजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी पुढे चालत असलेल्या MH-07 C 8144 क्रमांकाच्या टाटा मॅजिक रिक्षाला (चालक – अल्लाउद्दीन अब्दुल रज्जाक, वय ४५, रा. नांदगाव, ता. कणकवली) कारने मागून धडक दिली.
धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या बाजूला झाडीझुडपात गेली. अपघातात रिक्षामधील प्रवासी गवस कासिम साठविलेकर (वय ४२), मज्जाद अब्दुल रजाक साठविलेकर (वय ३०), कासम उस्मान नावळेकर (वय ५५) व अहमद युसुफ साठविलेकर (वय ३५, सर्व रा. नांदगाव, ता. कणकवली) हे जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी श्री. चोडणकर, पोहे कॉ. सरमळकर व पो.कॉ. जगताप यांनी भेट देऊन पंचनामा केला.
अपघातानंतर वाहतूक सुरळीत सुरू असून पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
