मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देण्यात आला वृक्ष संवर्धनाचा संदेश..
⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव येथील मायापूर्वचारी मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेंतर्गत काल गुरुवारी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने विविध माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत. याच शासनाच्या आदेशाचे पालन करून सध्या होत असलेली बेसुमार वृक्ष तोड पाहता गजाजन उर्फ प्रकाश राऊळ यांच्या संकल्पनेंतर्गत श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या मूर्ती पुनः प्रतिष्ठापना मुख्य सोहळ्यानिमित्त एकीकडे पाषाणांची प्रतिष्ठापना होत असताना त्याचवेळी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. १२ पोफळी व ४ माड अशी मिळून १६ वृक्ष लावण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजेंद्र परब, सोनुर्ली येथील नंदू गावकर, गजानन राऊळ, बाळा गावकर, निरवडे माजी सरपंच सदा गावडे, विवेक नार्वेकर, महेश पंतवालावलकर, पांडुरंग राऊळ, सहदेव राऊळ, सुनील राऊळ, ऋषिकेश राऊळ, रामकृष्ण पंतवालावलकर, श्रीकृष्ण गावकर, दीपक जोशी आदी उपस्थित होते.
