विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २५ रोजी कै. गुरुवर्य रा. गो. सामंत स्मृतिदिन समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल, चे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रशालेच्या वतीने बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केलआहे.
या स्पर्धेतील पारितोषिके ,प्रथम क्रमांकास चषक व २०००₹रुपये
,द्वितीय क्रमांक चषक व १५००₹ रुपये,तृतीय क्रमांक चषक व एक १०००₹ तसेच उत्तेजनार्थ ७००₹ रुपये असून या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक व सहकारी आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल च्या वतीने करण्यात आले.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.
गीतामध्ये समाविष्ट असणाऱ्या मुलांची संख्या दहा पेक्षा अधिक असू नये,गीत मराठी किंवा हिंदी भाषेतील असावे,गीत देशभक्तीपर असावे ,इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करू नये,स्पर्धकांनी नियोजित वेळेपूर्वी हजर राहावे.

स्पर्धेची नावनोंदणी २३ फेब्रुवारी पर्यंत करणे आवश्यक असून
स्पर्धेसाठी संपर्क ,भागीत यु.बी.९४२०६३६४५५
श्रीम.साळवी के.के.
९७६४२०९४२३
श्रीम.परूळेकर एम.एन.
९४०३९३८२७० या नंबर वर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page