चेंदवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती…

⚡कुडाळ ता.१४-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेमार्फत ‘ज्ञान ज्योत’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मंथन खोबरेकर (६ वी), धृतीका ठुंबरे (७ वी), दुर्वेश करलकर (१० वी) व लावण्या केरकर (५ वी) या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹३,६००/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रसाद परब व गुरु देसाई यांच्या सहकार्यामुळे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. या सहकार्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार व शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी संस्थेचे व सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page