मनसेच्या वतीने कळणे येथे आरोग्य शिबीर संपन्न…

कळणे सहित इतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेत करून घेतली आरोग्य तपासणी…

*⚡दोडामार्ग ता.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेजस्वीनी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून सोमवारी कळणे येथे आरोग्यवर्धनी उपकेंद्र संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॉनिंग पध्दतीचे आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीरात १०० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला. मनसे आयोजित तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून कळणे येथे ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी संपूर्ण शारीरिक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओथेरपी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात हार्ट टेस्ट, ईसीजी टेस्ट, मेंदू कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, पित्ताशय, स्वादुपिंड, मुत्रपिंड, फुफ्फुस, मेंदुचे विकार, हाडांचे विकार, लठ्ठपणा, बेसीक तपासणी, स्त्रीयांचे आजार अशा विविध प्रकारच्या ५० ते ६० आरोग्य तपासण्या संगणकीय जर्मन स्कॉनिंग पध्दतीने करण्यात आल्या. या शिबिरात १०० हून अधिक ग्रामस्थानी सहभागी होत लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता मनसे विभागअध्यक्ष श्री.अभय पांडुरंग देसाई, महाराष्ट्र सैनिक श्री.अरुण देसाई, श्री. सुनील परब, यांनी मेहनत घेतली. ह्या आरोग्य शिबीरला गाव देवस्थान प्रमुख श्री. सखाराम रामचंद्र देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री. कुणाल किनळेकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष श्री. आशिष सुभेदार, कुडाळ तालुका सचिव श्री. राजेश टांकसाळी, सतर्क पोलिस टाईम साप्ताहिकाचे सल्लागार संपादक श्री. राजन रेडकर, जिल्हा परिषद सदस्य सौ.संपदा देसाई, उद्योजक श्री. गणपत देसाई, कळणे सरपंच सौ.प्रिया नाईक, श्री. मिलिंद नाईक, श्री. प्रमोद ठोंबरे राजेश सातोस्कर अनुप सोनी आदी उपस्थित होते. तसेच सदर कॅम्प राबविल्याबद्दल कळणे, उघाडे, भीके कोनाळ, मोरगाव वासियांनी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे कळणे विभागअध्यक्ष श्री. अभय पांडुरंग देसाई व मनसेच्या पदाधिकाऱ्याचे आभार मानले.

You cannot copy content of this page