⚡देवगड ता.०५-:
मालवण – चिंदर येथील विजय पांडुरंग गावकर (वय ५२, रा. माधववाडी) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास देवगड तालुक्यातील पोयरे सडा येथे आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोयरे सडा येथे एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर मृत व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच मालवण चिंदर येथील सुबोध लक्ष्मण गावकर यांना तो मृतदेह त्यांचे शेजारी विजय गावकर यांचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी येत मृतदेहाची ओळख पटवली. घटनास्थळी मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणला. विजय गावकर याला दारुचे व्यसन होते. घटनेची खबर सुबोध गावकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.
