दिवाणी न्यायालय, विधी सेवा समिती आणि वकील
संघटनेचे आयोजन..
कुडाळ : दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेअंर्तगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग एम आय डी सी कुडाळ येथे जन जागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोबाईल व्हॅन मार्फत लोक अदालत तसेच जन जागु्ती शिबीरांचे नियोजीत कार्यक्रमातील जनजागृती कार्यक्रम दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग एम आय डी सी कुडाळ येथे संस्थेचे प्राचार्य अरुण मर्गज यांचे अघ्यक्षेतेखाली संपन्न झाला. यावेळी वकील श्रीमती राजश्री नाईक यांनी अन्न व शिक्षणाचा अधिकार या कायदयाची माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणात मुलभूत गरजापैकी अन्न व शिक्षणाचे आपल्या जीवनात महत्व काय असते तसेच त्या गरजांचे अधिकार व कायदे काय असतात याबाबत माहिती दिली. वकील डी. आर. बीले यांनी बालकांचे लैगीक शोषण अधिनियम कायदयाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात समाजात कशा प्रकारे बालकांचे शाेषण होवू शकते आणि त्या शोषनापासुन आपण कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. विधी स्वंयंसेवक सुधा दामले यांनी महाराष्ट लोकसेवा हक्क कायदा २०१५ ची माहिती दिली. त्यांनी प्रत्येकाला आवश्यक असणारे दाखले शासकिय कार्यालयामधुन कसे प्राप्त होतात त्याबाबत माहिती दिली. विधी स्वयंसेवक प्राची परब यांनी बळी नुकसान भरपाई योजना याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणात पीडित व्यक्तीना कशा प्रकारे सहाय्य मिळते व त्यासाठी कशाप्रकारे कार्यवाही केली जाते याबाबत माहिती दिली. दिवाणी न्यायालय कुडाळचे वरीष्ठ लिपीक आर. टी आरेकर यांनी विधी सेवा प्राधिकरणाची कार्यपध्दती व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवत असलेल्या योजना व उपक्रम याबाबत माहिती दिली.
बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी अघ्यक्षीय भाषणात या कार्यक्रमांमुळे विदयार्थ्यानां विविध कायदयांची मोलाची माहिती मिळाली व विधी सेवा प्राधिकरणचे व्यापक कामकाजाबाबत प्रसंशा केली
यावेळी प्राचार्य चैताली बांदेकर, परेश धावडे, मंदार जोशी, वैशाली ओटवणेकर, तसेच १६० ते १६५ विदयार्थी व कर्मचारी उपस्थतीत होते.
