श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक सोहळ्या निमित्त विशाल परब यांनी भेट देत घेतले दर्शन…

सावंतवाडी : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहरातील जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यानिमित्त आज भाजप युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानात भेट देत दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी सर्व जनतेला सुख, समाधान व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळो, असे साकडे देव चरणी घातल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावर्षीही या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अभिषेक पूजा सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे. या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने श्री. परब यांनी देवस्थानात उपस्थित राहून आशीर्वाद घेतले.

You cannot copy content of this page