आडेली पं. स. मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी : समिर कुडाळकर…

⚡वेंगुर्ला ता.०५-: गेली 17-18 वर्षे आपण नेहमी जनतेच्या आशिर्वादामुळेच आज आडेली पंचायत समिती मतदारसंघातून रिंगणात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता निश्चितच आपल्याला आशीर्वादरुपी साथ देऊन विजयी करेल, असा विश्वास आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे ( अपक्ष ) उमेदवार जनार्दन उर्फ समीर रुकमांगद कुडाळकर यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आडेली कामळेवीर येथे प्रचारात बोलताना व्यक्त केला. आडेली, मठ, वेतोरे, पालकरवाडी, कामळेवीर भागातून प्रचार संपल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले, आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटी चेअरमन म्हणून काम करताना ( 2015 ते 2022) आपण जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासालाच प्राधान्य दिले आहे. वरिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, भाजपा वेंगुर्ला तालुका चिटणीस म्हणून काम केले आहे. तसेच वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संचालक म्हणून आपले कार्य सुरु आहे. प्रचारास कमी कालावधी मिळाला असला तरी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. आपले कुटुंबीय हे सामाजिक कार्यात असून पत्नी समिधा कुडाळकर ही आडेली ग्रामपंचायत सरपंच असताना येथील जनतेने आपल्याला, आपल्या सहकाऱ्यांना विशेष प्रेम, सन्मान दिला आहे. त्यामुळे आडेली मतदारसंघातील जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी प्रचाराच्या समाप्तीवेळी आडेली कामळेवीर येथे बोलताना व्यक्त केला. यावेळी समिर गडेकर, आडेली माजी सरपंच समिधा कुडाळकर, वैशाली कुडाळकर, सविता कुडाळकर, माजी ग्रा. पं. सदस्य संतोष पेडणेकर, श्री. धर्णे, सरिता गडेकर, सत्यवान कुडाळकर आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page