शावियर फर्नांडिस:इन्सुली जि.प. मतदारसंघात शावियर फर्नांडिस यांची प्रचारात जोरदार आघाडी..
सावंतवाडी ता.०५:-
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी नियोजनबद्ध व प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून शावियर फर्नांडिस हे ही निवडणूक लढवीत आहेत.
इन्सुली मतदारसंघात यापूर्वी झालेल्या विविध विकासकामांमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी खासदार नारायण राणे व आमदार दीपक केसरकर यांना भरभरून पाठिंबा दिला होता. या यशामध्ये संजू परब यांच्यासह महायुतीच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता.
प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना शावियर फर्नांडिस यांनी सांगितले की, केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून इन्सुली मतदारसंघातील रखडलेली विकासकामे मार्गी लावणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे.
केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मतदारांनी आपल्याला विजयी करावे, असे आवाहनही शावियर फर्नांडिस यांनी केले.
