मळगाव इंग्लिश स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना १९८७-८८ एसएससी बॅचच्यावतीने गणवेश वाटप

सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या एसएससी बॅच १९८७-८८ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेतील गरजू व होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीनीना गणवेश वाटप करण्यात आले.

शाळेत शिकत असताना आपण एकमेव शालेय गणवेषाच्या बाबतीत जी गैरसोय अनुभवली ती सध्या शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींवर ओढवू नये. ते शाळेत नेहमीच आकर्षक दिसावेत. या उदात्त विचारसरणीतून या बॅचतर्फे शाळेतील गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींना शाळेच्या सभागृहात हे वाटप करण्यात आले. यावेळी मळगाव ऐक्यवर्धक मळगाव संस्थेचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापिका प्रमिला राणे-सावंत, जेष्ठ शिक्षक सुनील कदम, विठ्ठल सावंत, ग्रंथपाल सतीश राऊळ, एसएससी बॅच १९८७-८८ बॅचचे विद्यार्थी हरी वारंग, श्यामसुंदर मेस्त्री, महेश शिरोडकर, रामचंद्र लोके, विजय गावडे, सुखदेव राऊळ, ग्रामस्थ पालक संदेश राऊळ आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गृपतर्फे जमा रक्कमेतून तयार करण्यात आलेले गणवेश इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी भाग्यश्री बाईत, निविदा चौगुले, तनिष्का राऊळ, रेश्मा शिरोडकर, शर्वाणी मातोंडकर, दर्शना राऊळ व विद्यार्थी कृष्णा जाधव, प्रशांत पाटील, प्रितेश कोळेकर, तेजस गावडे, इयत्ता आठवी(अ)तील विद्यार्थीनी मयूरी बाईंग, साक्षी मोपकर, विद्यार्थी हरिश्चंद्र राऊळ,नवसो जाधव, सर्वेश कोळेकर, इयत्ता आठवी(ब)तील विद्यार्थीनी ऋतुजा पार्सेकर, गायत्री देऊलकर, यशस्वी पेंडूरकर, मेघना सावळ व विद्यार्थी रामचंद्र सातार्डेकर, युवराम पेडणेकर या शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेष वाटप करण्यात आले. तसेच राहिलेल्या चार विद्यार्थी-विद्यार्थीनीनाही लवकरच गणवेष वाटप करण्यात येणार असल्याचे बॅचच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला राणे-सावंत, खजिनदार नंदकिशोर राऊळ यांनी या गणवेष वाटप मोहिमेचे कौतूक करताना या बॅचच्या विद्यार्थ्यांचे आभार मानून बॅचतर्फे भविष्यातही असेच कार्य व मदत शाळेला मिळत रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. बॅचचे विद्यार्थी हरी वारंग, महेश शिरोडकर, श्यामसुंदर मेस्त्री यांनी शाळेतील आठवणी व प्रसंग व्यक्त करुन उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनीनी भविष्यात चांगली प्रगती करावी व यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आवाराची व स्थितीची पहाणी करुन आवश्यक गरजांचा आढावा घेतला व त्या गरजा पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page