आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
*⚡सावंतवाडी ता.१४-:* सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी शासनाने नियोजन केले असून, त्यासाठी पोलिस यंत्रणेला अजुन बळकटी येण्यासाठी ताकद पुरवली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणसाठी आधुनिक नौका पुरवण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी झूम ॲप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील जेल मध्ये पर्यटन केंद्र सुरू करून, येथील जेल ओरोस येथील नवीन जेल मध्ये स्थलांतर करावे अशी मागणी केली असून, सावंतवाडी येथील जेलला पर्यटन केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.