भाजपने फुकाचे श्रेय लाटू नये

बाबू कुडतरकर यांचे टिकास्त्र;ओपन जिमची संकल्पना केसरकर यांची असल्याचा केला खुलासा

सावंतवाडी : दुसऱ्याच्या प्रभागातील विकासकामांचे श्रेय घेण्यापेक्षा भाजपने आपल्या प्रभागातील विकासकामे करून दाखवावीत, असा टोला शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी लगावला आहे. शहरात होणाऱ्या ओपन जिम आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून होत असून त्यात भाजपचे कोणतेही योगदान नाही, असा खुलासाही कुडतरकर यांनी केला आहे.

कुडतरकर यांनी म्हटले आहे की, शहरात होणाऱ्या ओपन जिम आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून होत आहे. या विकासकामासाठी शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भाजपला श्रेय घ्यायच असेल तर त्यांनी आपल्या प्रभागात विकासकामं करून घ्यावं, दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये जाऊन श्रेय घेऊ नये असा टोला कुडतरकर यांनी लगावला. तर विकासकामांसाठी पाठपुरावा कुणी केला ? निधी कुणी दिला ? हे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना ठाऊक असल्याच टिकास्त्र त्यांनी केल.

You cannot copy content of this page